तुंगत सोसा.चेअरमनपदी रणदिवे तर व्हा.चेअरमनपदी पवार यांची निवड.

 तुंगत (प्रतिनिधी):- 
पंढरपूर तालुक्यातील तुंगत विविध का.से.सोसायटी नं.१ चे चेअरमनपदी महादेव देवचंद रणदिवे तर व्हा.चेअरमन पदी नारायण अंकुश पवार यांची बिनविरोध निवड झाली.
   नुकत्याच पार पडलेल्या तुंगत सोसायटीच्या निवडणुकीत मा.आ.प्रशातराव परिचारक व  येथील परिचारक विरोधी सर्व गट एकत्र येऊन अंत्यत चुरशीची लढत झाली होती मात्र मा.आ. परिचारक गटाचे मा.सरपंच आगतराव रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल चे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्य मिळवून विरोधी गटाला पराभवाचा धक्का दिला.
     दि.९ सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीमती योगिता मुरडे    यांचे अध्यक्षतेखाली चेअरमन, व्हा.चेअरमन निवडीसाठी सर्व संचालक मंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी चेअरमन पदासाठी महादेव देवचंद रणदिवे व्हा.चेअरमन पदासाठी नारायण अंकुश पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने यांची बिनविरोध निवड झाल्याची मुरडे यांनी जाहीर केले.
     मा.आ.प्रशांतराव परिचारक यांचेकडून नुतन चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सन्मान करीत सर्व संचालक मंडळ यांना संस्थेचा पारदर्शक कारभार  करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
   यावेळी मा.सरपंच आगतराव रणदिवे,मा.चेअरमन तानाजी रणदिवे,संजय रणदिवे,सुधीर भोसले,महेंद्र रणदिवे,संचालक खंडेराव रणदिवे,लक्ष्मण कदम,शिवाजी नागणे, अजित रणदिवे,वामन वनसाळे, राजू भोसले, पांडुरंग नागटिळक,  संतोष भांगे, म्हाळाप्पा कोळेकर,ब्रह्मदेव रणदिवेआदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form