सोलापूर प्रतिनिधी --
सोनार समाजातील तरुण तरुणी मध्ये प्रचंड क्षमता आहे. त्या क्षमतेला दिशा देण्यासाठी, स्वप्नांना प्रत्येक्षात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. सोनार समाजातील विविध घटकांना, बेरोजगार तरुण तरुणी यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन विविध योजना च्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात येतं आहे. सोनार युवकांच्या हाताला काम दिले तर ते इतरांसाठी रोजगार निर्माण करतील याच विचाराने संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आणि सध्या हे महामंडळ कार्यरत आहे. हे महामंडळ शासनाच्या अधीपत्याखालील आहे. हे महामंडळ प्रामुख्याने सोनार समाजासाठी आर्थिक सहाय्य पुरवून स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेले आहे.
या महामंडळा मार्फत 20 % बीज भांडवलं योजना, रुपये एक लाख पर्यंतची थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रुपये 15 लाख पर्यंतची कर्ज योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना, याशिवाय या महामंडळाच्या योजना अंतर्गत सुरु करता येण्यासारखे कांही व्यवसाय जसे की, कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, आल्यूमिनियम फॅब्रिक शॉप, ऑटो स्पेअर पार्टस, पुस्तक दुकान, फळं / भाजीपाला विक्री दुकान, जनरल स्टोअर्स, हार्ड वेअर व पेंट शॉप, लाकडी वस्तू बनविणे, वीट भट्टी, टेलरिंग युनिट, वास्तू विशारद व्यवसाय, ग्लास व फोटो फ्रेम सेंटर, कापडं दुकान, दवाखाना, अभियांत्रिकी सल्ला केंद्र, हॉटेल व्यवसाय, औषधं दुकान ई. व्यवसाय करता येतात.या महामंडळाचा मुख्य उद्देश सोनार समाजातील तरुण, तरुणीना व्यवसायासाठी लागणारी भांडवली मदत पुरवून त्यांना स्वावलंबी बनविणे. यामुळे अनेकांना स्वतःचे उद्योग सुरु करणे शक्य होणार आहे. महामंडळाच्या मदतीने ग्रामीण भागातील सोनार युवकांनी देखील याचा जास्तीतजास्त लाभ घेऊन आपली प्रगती साधून जीवनाचा उत्कर्ष घडवू या.
संतोषशेठ कळमणकर
अग्रणी प्रवर्तक,
सोनार समाज संस्था सोलापूर .
मोबा. 98501 36061
Tags
सामाजिक वार्ता