क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्षपदी सोमनाथ कोळी यांची निवड

पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर येथील अंबिका नगर येथील रहिवासी, सोमा उर्फ सोमनाथ संभाजी कोळी यांची निवड क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी सामाजिक संघटना या सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष या पदासाठी दि०३ सप्टेंबर २०२५रोजी संघटनेचे अध्यक्ष  पांडूरंग सदाशिव परचंडराव यांचे सही ने नियुक्ती करण्यात आली.
 
नियुक्ती समारंभ पंढरपूर येथील कोळी महादेव वतनदार समाज मठ येथे घेण्यात आला. सदरचे नियुक्ती पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  पांडूरंग सदाशिव परचंहराव, मार्गदर्शक  सुभाष अधटराव सर मुख्याध्यापक यांचे हस्ते देण्यात आले,  सोमनाथ उर्फ सोमा संभाजी कोळी यांना नियुक्तीपत्र त्यांनी अनेक संघटनांच्या माध्यमातून आजवर जे सामाजिक कार्य केले त्या कामाचा शिस्तपूर्ण अभ्यास, सर्व समाजबांधवांना बरोबर घेवून शिस्तपूर्ण कार्य करून उल्लेखनिय कामगिरी केल्यामूळे त्यांना या पुढे त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या या पदाचा वापर अनु-सूचित जमातींना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडिअडचणी सोडवि-ण्यासाठी, अनुसूचित जमातीच्या जमात सदस्यांवर होणाऱ्या अन्याया विरूद्ध लढण्या करीता, देण्यात आले.

या प्रसंगी त्यांचे अत्यतं जिवलग सहकारी अनुक्रमे प्रदीप परचंडराव, श्रीकांत ननवरे, कुंदन अभंगराव, संजय नेहतराव, अनिल तात्या अधटराव, गणेश अंकुशराव आणि माऊली माने आणि पंढरपूर येथील कोळी महादेव समाजातील अनेक मान्यवर आणि कोळी महादेव समाज उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form