पंढरपूर प्रतिनिधी
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी येथे दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी ‘माय स्टोरी – मोटिव्हेशनल सेशन बाय सक्सेसफुल इनोव्हेटर’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून श्री. स्वप्नील पाटील (मंगळवेढा औद्योगिक वसाहत) यांनी मार्गदर्शन केले. हे व्याख्यान इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (IIC) सेल अंतर्गत घेण्यात आले.
श्री. पाटील यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील संघर्ष, नावीन्यपूर्ण कल्पना राबवताना आलेल्या अडचणी, मिळवलेले यश आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा प्रेरणादायी अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अपयश हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर काहीही शक्य आहे.”
या विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नवी ऊर्जा निर्माण झाली. अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या.
या कार्यक्रमास 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमास विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags
शैक्षणिक वार्ता