पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर येथील जुनी पेठ पोलीस चौकी समोरील भगवंत मेडिकल समोर चेंबर वारंवार फुटत होता.सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते त्यामुळे वाहतुकीस धोकादायक रस्ता झाला होता.यासाठी स्वराज्यचे तालुकाध्यक्षांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरपालिकेने घेतली तातडीची दखल.
सदर रस्ता वर्दळीचा तसेच मध्य सोलापूर रोड असल्याकारणाने परंतु आज आपल्या संघटनेच्या वतीने पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रवीण सुरवसे, पत्रकार व प्रसिद्धी प्रमुख विनोद पोतदार यांनी लक्ष घालून सदर ठिकाणी चांगल्या प्रकारचे झाकण बसवायला सांगितले व पुन्हा त्यामुळे वाहतुकीस त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले व त्याप्रमाणे पंढरपूर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष उपमुख्य अधिकारी सूर्यवंशी यांनी तातडीने दखल घेऊन सदर कॉन्ट्रॅक्टदाराला चांगल्या प्रकारचे झाकण बसवण्यास सांगितले व ते काम आज पूर्ण झाले व तरीही काही अडचण आल्यास त्या ठिकाणी यापेक्षा उत्तम दर्जाचे झाकण बसवून देतो असे त्यांनी आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी स्वराज्य पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पंढरपूर तसेच संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे महासचिव कमलेश शेवाळे महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री ताई उत्पाद पश्चिम महाराष्ट्राअध्यक्ष रामभाऊ बडवे उपाध्यक्ष कैलास कारंडे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष प्रवीण सुरवसे यांनी सदर सामाजिक जाणवेतून केलेल्या कामाचे समाजातून व संघटनांच्या वतीने कौतुक होत आहे.
Tags
सामाजिक वार्ता