पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शनिवार, ३० ऑगस्ट २०२५ रोजी "ऑपर्च्युनिटी थ्रू गेट" या विषयावर माजी विद्यार्थीनी पूनम शिंदे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरूवात माजी विद्यार्थीनी पूनम शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून करण्यात आला. यावेळी त्यांनी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी गेट परीक्षेचे महत्त्व, त्याद्वारे मिळणाऱ्या उच्च शिक्षण व संशोधनाच्या संधी, शिष्यवृत्ती योजना आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांना गेट तयारीसाठी उपयुक्त टिप्स, अभ्यासाचे धोरण आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्यांची माहितीही त्यांनी दिली. सदर व्याख्यानास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. स्वप्निल टाकळे, प्रा. सोनाली गोडसे यांसह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Tags
शैक्षणिक वार्ता