प्रा. स्वाती कराड-चाटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजर...

वाखरी (ता. पंढरपूर) : 
माईर्स एमआयटी ग्रुपच्या विश्वस्त व महासचिव तसेच एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ आणि विश्वशांती गुरुकुलच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड-चाटे यांचा वाढदिवस एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाखरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त स्कूलमध्ये महामृत्युंजय मंत्राचे पठण विद्यार्थ्यांनी केले तसेच विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात अन्नधान्य सामुग्री देण्यात आली आणि वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ, हेडमिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी यांच्यासह शाळेचे व ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण संवर्धन व समाजप्रबोधन या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या भाषणांत प्रा. स्वाती कराड-चाटे यांचे सामाजिक, शैक्षणिक योगदान व प्रेरणादायी कार्य अधोरेखित केले. कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form