पंढरपूर प्रतिनिधी-
पंढरपूर येथे लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा उद्या सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार असल्याची माहिती डॉ. विश्वजित देशमुख यांनी दिली.
लाईफलाईन हॉस्पिटल म्हणजे पंढरपूर येथील नामांकित वैद्यकीय उपचारासाठी प्रसिद्ध असणारे हॉस्पिटल असुन यामध्ये त्यांनी नव्याने अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचे सुरूवात करीत आहेत या नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन सौ.शुभांगी व श्री रमेशराव माणिकराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील,माजी आमदार शहाजी बापु पाटील, आमदार बाळासाहेब देशमुख, चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हा अध्यक्ष वसंत नाना देशमुख,माजी चेअरमन भगिरथ भालके, जयसिंग देशमुख, प्रशांत भैय्या देशमुख, डॉ.ऋतुजा उत्पात, डॉ.अमरसिंह जमदाडे, डॉ.अमितकुमार आसबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वांनी या नुतन अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहावे असे हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
Tags
वैद्यकीय वार्ता