पंढरपूर प्रतिनिधी-
दहीहंडी कार्यक्रमादिवशी जुनी पेठ येथे सतूरने वार झाल्याची घटना ताजी असतानाच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक पार पडते न पडते तोच शुक्रवार दी २२ऑगस्ट रोजी भरदुपारी दोन गटात हाणामारी होऊन एकावर सतूरने चार झाल्याची घटना घडली. यामुळे पंढरीत खळबळ उडाली आहे .कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे दिसून येत आहे.
पंढरपूर शहराला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे .यापूर्वीही शहरांमध्ये टोळी युद्ध घडल्याच्या घटना आहेत.शुक्रवारी सकाळी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या
मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवासंदर्भात शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीत शांतता व कायदा सलोखा राखण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठक संपतेय तोच दुपारी दीड वाजता गजानन महाराज मठासमोर श्रेयस धर्मा पवार (वय २०) रा. पद्मावती झोपडपट्टी, पंढरपूर याच्यावर धारधार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले.
दीडच्या दरम्यान भर चौकात दोन गटांमध्ये हाणामारी होऊन दोन समाजात तेढ निर्माण करणारी घटना घडली. यातच एकाने सत्तूरने वार करून एकाला गंभीर जखमी केले. सदर युवकास सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते: परंतु इथे उपचार होत नसल्यामुळे त्याला सोलापूर येथे हलवण्यात आले असल्याचे समजते. अद्यापही पोलिसांकडून याबाबतची कोणतीही माहिती मिळाली नाही. तरी गणेशोत्सव व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्हेगारी टोळ्यांना वेळीव चाप लावणे गरजेचे आहे.
पंढरपूर शहरात अवैध सावकार, अवैध वाळू उपसा यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. यातूनच वर्चस्वासाठी दोन गट, दोन जातीमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. त्याला काही तिकाणी राजकीय पातवळ मिळत आहे. अशा गुन्हेगारांचा पोलिसांनी वेळीच लावणे गरजेचे आहे. पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, अशी मागणी आता होत आहे.रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती.
चौकट.
मागील महिन्यात दि.१७जुलै रोजी कुंभार गल्ली परिसरात आई व मुलाची सत्तूर ने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती, या घटनेला एक महिना उलटून देखील अजूनही आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले नाही.
Tags
सामाजिक वार्ता