पंढरपूर प्रतिनिधी-
पंढरी नगरीत कृष्णाष्टमीच्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पंढरपुरातील प्रसिद्ध अशा चौफळा येथील श्रीकृष्ण मंदिरात भल्या पहाटे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्णाची देऊळ पुरातन असून ते बडवे यांच्या मालकीचे आहे या कृष्ण मंदिरात बडवे कुटुंब तसेच परिसरात बसणारे फुलमाळी विक्रेते यांच्यासह सर्वजण कृष्णाष्टमीच्या सोहळ्याकरता सहभागी होतात मंदिरावर विद्युत रोषणाई तसेच फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आलेली आहे.
पहाटे श्रीकृष्णास पियुष बडवे सागर बडवे पप्पू बडवे सुभाष बडवे व त्यांच्या परिवाराच्या व भाविक भक्तांच्या वतीने महाअभिषेक, नैवेद्य श्री गोपाळ कृष्णास करण्यात आला.अभिषेकानंतर श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता देऊळ खुले करण्यात आले पहाटे पाच वाजल्यापासूनच कृष्ण भक्त आणि दर्शनासाठी व कृष्णाष्टमीच्या सोहळ्यासाठी रांग लागली होती संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे . भाविक भक्त तसेच बडवे कुटुंबाच्या वतीने प्रसाद म्हणून आलेल्या भक्तांना केळी शेंगदाण्याचे लाडू उपासाचे पदार्थ वाटप करण्यात आले.
सायंकाळी महिला मंडळ भजनाचा असून रात्री भजन व आरती झाल्यानंतर मध्य रात्रीच्या सुमारास कृष्ण जन्माष्टमीच्या सोहळ्यानिमित्त कृष्ण मंदिराच्या आतील भागात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
Tags
सामाजिक वार्ता