पंढरपूर नगर परिषदेकडून उद्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा/मूर्तीची पालखीतून मिरवणूक

पंढरपूर प्रतिनिधी- 
गोकुळ अष्टमी दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची 750 वी जयंती आहे.त्या अनुषंगाने पंढरपूर नगर परिषदेकडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा/मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे सन 2025 हे वर्ष सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे.
यानिमित्त शहरातील वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, विविध मठांचे मठाधिपती,शाळांमधील विद्यार्थी,
नगरपरिषद कर्मचारी व पंढरपूर शहरातील नागरिक यांचे सह शहरातून दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी नगर प्रदक्षिणा टाळ मृदंगाच्या घोषात भजन व हरिनाम जप घेत करण्याचे नियोजन आहे.तरी सदर दिंडी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मठ नाथ चौक येथून सायंकाळी पाच वाजता निघणार आहे या अध्यात्मिक सोहळ्यात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form