मोहोळ प्रतिनिधी --
आज मोहोळ या ठिकाणी सोलापूर जिल्हा व मोहोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता यांच्यावतीने मोहोळ नगर परिषदेच्या बालोद्यानांमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून श शिवलिंग आप्पा मेढेकर (अध्यक्ष सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना) व सिद्धेश्वर सावंत (सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना सदस्य) तर अध्यक्ष म्हणून गोरख अर्जुन भिलारे (माजी कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना शिवलिंग मेढेकर जिल्हाध्यक्ष यांनी मोहोळ तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने जिल्हा व राज्य संघटनेचे सदस्य होऊन आपल्या समस्या सोडवाव्यात तसेच जिल्हा संघटना आगामी काळात ग्रामीण व शहर विक्रेत्यांचा भेदभाव न करता 30 टक्के कमिशन मिळवून देणे, सात रुपये आधारभूत किंमत धरून त्यावर 30 टक्के कमिशन देणे, क्रेडिट नोट देणे, पुरवणी भरणावळ, कॅलेंडर हाताळणी चार्ज, त्यानंतर सुट्ट्यांची संख्या वाढवणे. या अशा अनेक विषयावर मागण्या करणार आहे यांची माहिती देण्यात आली. तर सिद्धेश्वर सावंत यांनी संघटना तयार करणे व संघटित राहून काम करणे हे खूप गरजेचे असल्याचे सांगितले तर श्री. गोरख भिलारे यांनी जिल्हा संघटनेच्या माध्यमातून आपल्या समस्या आपण सोडवू व कल्याणकारी मंडळाचे आपणाला फायदा कसा घेता येईल याविषयी विक्रेत्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीस मोहोळ तालुक्यातून अनेक विक्रेते सहभागी झाले होते शरद देशमुख देगाव, हनुमंत पवार नरखेड, विलास वाघमारे मोहोळ, गजानन बासर पाटकुल, लहू वसेकर टाकळी, राजाराम बाळसराफ कुरूल, राजेंद्र गुंड अनगर, सचिन गायकवाड मोहोळ,. सुभाष गायकवाड मोहोळ शेवटी हनुमंत पवार नरखेडकर यांनी आभार मानले.
Tags
सामाजिक वार्ता