पंढरपूर प्रतिनिधी -
पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावचे सुपुत्र नितीन कुलकर्णी यांना यावर्षीचा दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ते पुणे जिल्हा परिषदेत दिव्यांग विभागामध्ये निम वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्हा हे कार्यक्षेत्र असले तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते दिव्यांग क्षेत्रात मार्गदर्शनपर कार्य करीत असतात. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी दिव्यांग क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण केले असून कुलकर्णी त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
हिंदुररत्न डॉक्टर रवींद्र भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला आमदार राहुल कुल, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, रावेर मतदारसंघाचे आमदार राहुल जावळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करताना राष्ट्रसेवा व राष्ट्रवाद हा सर्वतोपरी असून सामाजिक कार्यात झोकून देऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचा उचित सन्मान होणे गरजेचे आहे व ते कार्य पद्मश्री मनीभाई देसाई ट्रस्ट करीत आहे. असे असे सांगितले आणि सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले.
असे पुरस्कारा व सन्मान मिळणे मोठी बाब आहे. त्यातून कामासाठी प्रेरणा मिळते आणि आणखी जबाबदारी वाढते. माझे समाजसेवेचे हे व्रत अखंडितपणे चालू राहील. अशा भावना नितीन कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.
Tags
सामाजिक वार्ता