250 बचत गटांना 15 कोटींचे अर्थसहाय्य वितरित
पंढरपूर प्रतिनिधी--
आंतरराष्ट्रीय महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस. दरवर्षी 8 मार्च रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने 8 मार्च 1975 रोजी महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केली होती. हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. यामुळे या दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथील
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पंढरपूर च्या वतीने स्वयं-सहायता गट क्रेडिट लिंकज कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला 300 हून अधिक महिला सदस्यांनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक यांनी उपस्थिती लावली.
या वेळी 250 बचत गटांना 15 कोटींचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले. पीक कर्ज नूतनीकरण, व्यवसाय कर्ज परतफेड आणि सुरक्षा विमा याबाबत महिलांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
बँकेने प्रदान केलेल्या आर्थिक मदतीचा उपयोग महिलांनी स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी करावा. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या बचत गटांना बँकेकडून अधिक सहकार्य मिळते, त्यामुळे घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड करणे आवश्यक आहे.
महिलांनी स्वयं-सहायता गटाच्या कर्जाचा पूर्ण लाभ घ्यावा, असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर झोनचे झोनल प्रबंधक संजीव कुमार यांनी केले. कार्यक्रम बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर शाखेने आयोजित केलेला कार्यक्रमासाठी बँकेचे वैभव घाडगे, युवराज केदार, निरंजन झिरपे, सचिन चवरे, सुधीर ठोंबरे, महेश गव्हाणे, अजय गौड, रविकिरण शिकारे ,गौरव सहरान ,सीताराम देठे ,अमोल नलवडे ,सोमनाथ हिंगमिरे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरपूर शाखेचे शाखाधिकारी चंद्रकांत मोरे यांनी उत्तमरीत्या पार पाडले.
Tags
सामाजिक वार्ता