नवरंगे बालकाश्रम संस्थेला शासनाचा ‘बालस्नेही पुरस्कार’ प्रदान

पंढरपूर प्रतिनिधी-- 
वा.बा. नवरंगे बालकाश्रम, पंढरपूर या  संस्थेला महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या बालस्नेही पुरस्कार 2024 साठी उत्कृष्ट बालगृह या नामांकनासाठी पुणे विभागातून निवड झाली आहे.

हा  पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे दिनांक 3 मार्च 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता  पार पडणार आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री अजित पवार  व महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थितीत राहणार आहे.

अनौरस बालकाशिवाय आई वडीलांपैकी कोणाचाही मृत्यू, दारिद्र्य, आई वडील विभक्त होणे आदी कारणामुळे निराधार गृहहीन होणारी मुले व मुलींना या संस्थेत प्रवेश दिला जातो. संस्थेत दाखल झालेपासून मुल, मुलीची पहिल्या दिवसापासून ते ही मुले सर्वार्थाने स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत त्यांची जबाबदारी ही संस्था घेते. आतापर्यंत अनेक अनाथ निराधार मुले मुली यांचे समाजात दत्तक देवून चांगले पुनर्वसन केलेले आहे. या कार्याची दखल घेऊन शासनाचा बालस्नेही पुरस्कार जाहीर केलेला आहे.

 महाराष्ट्रात व विशेषतः सोलापूर जिल्ह्यांत ही संस्था १४९ वर्षे महिला व बाल कल्याण क्षेत्रात सामाजिक कार्य करीत आहे. महिला व बाल विकास आयुक्त पुणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर तसेच संस्थेचे अध्यक्ष, सदस्य, बालक कल्याण समिती, सोलापूर यांनी संस्थेच्या विकासासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले असल्याची माहिती संस्थेच्या अधिक्षिका राजश्री गाडे व धर्मराज डफळे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form