पंढरपूर प्रतिनिधी--
पांचाळ सोनार समाज वधु वर सुचक मंडळ यांच्या तर्फे पंढरपूर वधु वर पालक परिचय मेळावा १६ मार्च रविवार रोजी फरताळे दिंडी क्र.०९, भक्ती मार्ग,संत गाडगेबाबा चौक, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले असल्याचे आयोजक केशव महामुनी यांनी माहिती दिली.
पांचाळ सोनार समाज वधु वर सूचक मंडळ पंढरपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या वधु वर पालक परिचय मेळाव्यास समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. तसेच मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.संपुर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध भागातुन वधु वर पालक मेळाव्यास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. या वधु वर पालक परिचय मेळाव्यास समाजातील सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आयोजक यांनी आवाहन केले आहे.
यावेळी वेदाध्यायी सदानंद महामुनी,सुमित पारखे,विशाल कोन्हेरीकर, पांडुरंग महामुनी,रत्नाकर वेदपाठक, सारंग महामुनी,वैभव महामुनी,विशाल महामुनी,सुयश महामुनी,संजय वेदपाठक आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता