सांगोला प्रतिनिधी--- रविराज शेटे
श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरले आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचा नित्य ध्यास लागून आचरणात आले पाहिजे.
जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होते व यासाठी जोगेश्वरी माता विद्यालय वाडेबोल्हाई ता. हवेली.जि. पुणे येथे शनिवार दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामीभक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले. सदर प्रबोधनास उपस्थित राहावे असे आव्हान आबाजी पायगुडे, गोरख पायगुडे, रमेश पायगुडे, श्रीनाथ पायगुडे, सागर पायगुडे, श्रीकांत पायगुडे यांनी केले आहे. तसेच गुरुभक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून येईल तरी यासाठी सर्व स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे स्वामीभक्त गणेश पायगुडे व शिवम पायगुडे यांनी आवाहन केले आहे.
Tags
सामाजिक वार्ता