कलापिनी संगीत विद्यालयचा देवेश खरे तबला अलंकार परिक्षा उत्तीर्ण

पंढरपूर प्रतिनिधी-- 
भारतीय शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार व उच्चस्तरीय शिक्षण देणाऱ्या पंढरपूर मधील कलापिनी संगीत विद्यालय च्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्यावतीने नोव्हेंबर सत्र २०२४ मध्ये घेण्यात आलेले तबला अलंकार या परिक्षेत पंढरपूर येथील कु देवेश दिनेश खरे याने प्रथम क्रमांकासह हि परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. यासाठी त्याला सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ तबला वादक पं.दादासाहेब पाटील , सुप्रसिद्ध युवा तबला वादक व संगीत शिक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
तबला वादनाची अत्यंत आवड असलेल्या देवेश ने लहानपाणापासून अविरंत व अखंड मेहनत घेतली आहे. हि परिक्षा प्रथम क्रमांकासह उत्तीर्ण झाल्याने पंढरपूर च्या सांस्कृतिक विभागात देखील एक अभिमानाचा क्षण आहे. यासाठी कलापिनी संगीत विद्यालय देवेशचा परिवार तसेच पंढरपूर मधील अनेक संगीतकला प्रेमींकडून त्याचे विशेष  कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form