इंधन बचत व प्रदूषण मुक्ती करिता घेण्यात येणारी पंढरी सायल्कोथाॅन २०२५ उत्साहात संपन्न...

पंढरपूर प्रतिनिधी:- 
इंधन बचत व प्रदूषण मुक्ती करिता घेण्यात येणारी पंढरी
आम्ही पंढरपूरकर फाॅऊंडेशन व जिल्हा सायकलींग असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारी पंढरी सायक्लोथॉन २०२६ रविवार दिनांक १६ फेब्रुवारी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू आली. 


सदर पंढरी सायक्लोथॉन मध्ये अंदाजे ३७००सायकल प्रेमींनी  नाव नोंदणी करून सुद्धा ५००० च्यावर सायकल स्वार यावेळी हजर होते.शालेय जिवनात मुलांमध्ये सायकली विषयी प्रेम वाढावे व सायकल आरोग्यसाठी किती उपयुक्त आहे.तसेच इंधन बचत व प्रदूषण मुक्ती करिता घेण्यात येणारी सायकल मॅरेथॉन  गेली पाच वर्षापासून आम्ही पंढरपूर फाउंडेशन व जिल्हा सायकलींग असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त आयोजन करीत असल्याचे आम्ही पंढरपूरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी दिली.
  
सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला टी-शर्ट, खाऊ तसेच प्रशस्ती पत्रिकाचे वाटप करण्यात आले. 
तर पंढरी सायक्लोथॉनची सुरवात माढा विधानसभेचे आमदार अभिजीत आबा पाटील,चंद्रकांत अण्णा बागल,याच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ. मनोज भायगुडे,राधेशजी बादले-पाटील महाराज, कुमार वाघमोडे, डॉ.स्वप्नील शेटे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून  डीव्हीपी उद्योगसमूह, कुमार प्रॉपर्टीज, चंदूकाका सराफ, डॉ.भायगुडे,सुहासिनी उद्योग समूह,दीप सायकल, ट्युलिप हॉस्पिटल, डॉ. बोरावके हॉस्पिटल, जे.एम.ग्रुप,  डॉ.जाधव हॉस्पिटल, एस. के. मेनकुदळे इत्यादींनी या पंढरी सायक्लोथॉन साठी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी कार्यक्रमाचे नियोजन आम्ही पंढरपूरकर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सागर कदम, मंजित कदम, नवनाथ बाबर, राजाभाऊ गोसावी, रोफ बागवान  मुकेश निर्मळे,शेखर भोसले सतीश माने, गणेश थिटे , नाना शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form