पंढरपूर प्रतिनिधी--
हातकलंगले येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे आनंदगंगा फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने श्रीमती राजश्री पोतदार यांना हातकलंगले चे विद्यमान आमदार दलित मित्र श्री अशोक माने (बापू) यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
आनंदगंगा फौंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने संजय घोडावत युनिव्हरसीटी, हतकलांगले यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील समाज उपयोगी तसेच प्रेरणादायी कार्य केले असे महिला यांच्या कार्य कौतुक सोहळा कोल्हापूर येथे पार पडला.
यावेळी नारिशक्ती अवॉर्ड 2024 या आयोजित कार्यक्रमात जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी घाटगे,दलितमित्र विद्यमान आमदार अशोकराव माने,डॉ. तानाजी पवार, संस्थापक,स्नेहा निपुणराव कोरे,अध्यक्षा,
वारणा भगिनी मंडळ,डॉ.साधना पाटील मॅम,संचालिका यशवंत व्यसनमुक्ती केंद्र,जयश्री गीताजे, लेखिका आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता