पुणे प्रतिनिधी --
वृत्तपत्र व माध्यमामधून AI आर्टीफिशियल कृत्रिम बुद्धीमत्ता वापराचे भविष्यातील फायदे व तोटे या विषयावर पुणे येथील जे डब्ल्यू मॅरियट पंचतारांकित हॉटेलांमध्ये पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा, परिसंवाद पार पडली.
कार्यक्रमास राज्यपाल सी.पी.
राधाकृष्णन,केंदीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ,उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.तीन सत्रात कार्यक्रम आखणी करण्यात आली होती.उद्घाटन, राज्यपाल मानपत्र बक्षीस वितरण आणि परिसंवाद या सत्रातून सकाळ,पुढारी,
पुण्यनगरी,आय.बी.एन.लोकमत चे सर्व समूह प्रमुख यांच्या उपस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे भविष्यातील व्यावसायिक व नैतिक फायदे तोटे यावर साधक बाधक परिसंवाद पार पडला.
सदर कार्यशाळेस राज्यभरातून सर्व पत्रकार,वृत्तपत्रविद्या विद्यार्थी, अभियांत्रिकी विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचे वतीने किरण जोशी,दीपक कुलकर्णी यांनी उत्तमरीत्या पार पाडले.
Tags
सामाजिक वार्ता