पंढरपूर येथे लेबर फेडरेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मजूर संस्थेच्या सभासदांना भेट वस्तू देऊन सन्मानित ....

पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को.ऑफ.फेडरेशनच्यावतीने पहिल्यांदाच पंढरपूर तालुक्यातील सहकारी मजूर संस्थेच्या सभासदांना बोनस म्हणून भेट वस्तूचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक होते. 
नूतन वर्षानिमित्त आज बुधवार दिनांक १ जानेवारी२०२५ बुधवार रोजी पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयातील सभागृहामध्ये युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या शुभहस्ते सहकारी मजूर संस्थांच्या सभासदांना चांगल्या प्रतीच्या सतरंजीचे बोनस भेट वस्तू वाटप करण्यात आले आहे. 

याप्रसंगी बोलताना ते  म्हणाले की शासनाने सध्या सर्व विकास कामे ऑनलाइन केली आहेत.को-ऑपरेटिव्ह सहकारला भरपूर अधिकार आहेत तेव्हा लेबर फेडरेशनसाठी  आपण सरकारला कामा संदर्भात मागणीचे निवेदन तसेच विविध प्रश्नांवर माजी आ. प्रशांत परिचारक,आ.समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने ते आपण प्रश्न मार्गी लावू. सरकार आपले आहे.सरकार बहुमताचे सरकार आहे.आपण सहकारी मजूर संस्था यांना सर्वत्तो मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सोलापूर जिल्हा लेबर डिस्ट्रिक्ट फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले म्हणाले की लेबर फेडरेशनला मजूर संस्थेचे सभासद दरवर्षी १% वर्गणी देत असतात त्या वर्गणीच्या पोटी आज पर्यंत लेबर फेडरेशन कडे ८० लाख रुपये जमा आहेत त्यापैकी ५० लाखाची एफडी केली आहे. 

त्यामुळेच आज या ठिकाणी मी सभासदांना चांगल्या प्रतीची सतरंजी वाटण्याचा कार्यक्रम घेत आहे.तसेच सोलापूर जिल्ह्यातील सहकारी मजूर संस्थांना जिल्हा परिषदेकडे विकास कामे  देण्यात यावी यासाठी आपण जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे पाठपुरावा करावा मजूर संस्थेकडून चांगली कामे केली जात असतात तेव्हा जिल्हा परिषदेकडून यापुढे  संस्थांना कामे देण्यात यावीत असे लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी  करताना सांगितले.

सदर कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड,
उपसभापती राजू बापू गावडे,महादेव 
बागल,कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन कैलास खुळे,संचालक वसंत क्षीरसागर,संचालक बाळासाहेब बागल संचालक तानाजीराव वाघमोडे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जलसंधारण अधिकारी पंडितराव भोसले,कार्यक्रमाच्या शेवटी संजय साळुंखे यांनी आभार मानले या कार्यक्रमास जिल्हा फेडरेशनचे संचालक व मजूर संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form