आमीन शेख यांची भाजपाच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडे मागणी
संत भूमी आणि देवभूमीची प्रामाणिकपणे सेवा करून कमी कालावधीत मतदार संघात कोट्यावधींचा निधी आणून विकासाची गंगा आणणारे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या कामामुळे येथील जनतेने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे.याची दखल घेऊन त्यांना सोलापूर जिल्हा बरोबर राज्याचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर देवभूमी आणि मंगळवेढा संत भूमीचा विकास करण्यासाठी मंत्रीपदाची संधी देण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमिन शेख यांनी केली आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी कमी कालावधीत सतत पाठपुरावा करून आपल्या मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी, मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांसाठी उपसा सिंचन योजना याचबरोबर संपूर्ण मतदारसंघात रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, वीज सुविधा उपलब्ध करून देऊन विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये निधी आणून मतदार संघाचा कायापालट करीत पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या मनातील आमदार अशी एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आमदार आवताडे यांच्या कामाची हातोटी संपूर्ण जिल्ह्याने पाहिल्याने सोलापूर जिल्ह्याला आमदार समाधान आवताडे सारखा पालकमंत्री होणे गरजेचे आहे.
पंढरपूर तालुक्याला पूर्वीपासूनच मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार समाधान आवताडे यांना मंत्री पदाची संधी दिल्यास आमदार आवताडे यांच्या कामाच्या हातुटीचा सोलापूर जिल्ह्याला याचबरोबर पंढरपूर देवभूमी आणि मंगळवेढा संतभूमीला फायदा होणार असून याचा भाजपालाहि मोठे फायदा होणार असल्याचे मत भाजपाचे आमीन शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.त्यांनी भाजपाच्या नेतेमंडळींकडे आमदार आवताडे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात यावी अशी मागणी केली असल्याचे सांगितले आहे.
Tags
राजकीय वार्ता