सोलापूर प्रतिनिधी --
येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना व पांचाळ सोनार समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 डिसेंबर रविवार रोजी,विजापूर रोड, निर्मिती लॉन्स येथे सामाजिक बांधिलकी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा प्रदान सोहळा व वधुवर पालक परिचय मेळावा मोठया दिमाखात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश धाराशिवकर जिल्हा अध्यक्ष सुवर्णकार संघटना व शहर प्रमुख शिवसेना उबाठा, विशेष अतिथी
दीपक कलढोणे, गायक, संगीतकार, लेखक आणि संत साहित्याचे अभ्यासक, प्रमुख अतिथी गिरीश पंडित सहा.आयुक्त सोलापूर महापालिका,उद्योजक भारत कारीकर सोलापूर-कोल्हापूर,अजित पोतदार -वशीकर मिरज,महाराष्ट्र शासन जल संपदा विभाग कोल्हापूरचे उप अभियंता उदय माणकापुरे, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव बळीराम पोतदार आलूरकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी दीप प्रज्वलन करून श्री संत नरहरी महाराज प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक अध्यक्ष वसंत पोतदार यांनी केले. आयुष्याचा उपयोग समाजासाठी करत संस्कारक्षम कार्य करणाऱ्या लोकांना समाजापुढे आणण्याचे काम पांचाळ सोनार समाज गौरव समिती करीत आहे.आयुष्यात समाजसेवा व देश सेवा करणं अत्यंत महत्वाचे आहे. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मान पत्र, आकर्षक सन्मान चिन्ह, तसेच सोनार समाजाची कुलदेवी श्री कालिका देवी महात्म्य हा ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी समाज भूषण पुरस्कार गिरीश पंडित लातूर,जगन्नाथ धर्माधिकारी मसूर,प्रमोद वेदपाठक माढा,सुभाष वेदपाठक मोडनिंब, सुरेश महामुनी,मोहन वेदपाठक,प्रकाश पोतदार,श्रीमती शशिकला वेदपाठक सर्व सोलापूर,चंद्रकांतदादा वेदपाठक
अकलकोट,सुभाष घोडके व सुभाष दीक्षित दोघेही रा.पुणे हे अनुक्रमे अपरिहार्य व प्रकृती अस्वास्थ्यमुळे उपस्थित राहू न शकल्याने त्यांचे पुरस्कार त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केले.आदर्श पतसंस्था पुरस्कार श्री विश्वकर्मा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था जत जिल्हा सांगली या संस्थेचे चेअरमन देवेंद्र पोतदार यांना देण्यात आले. कृतज्ञता पुरस्कार दीपक कलढोणे व सतीश जेऊरकर यांना प्रदान केले.आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रा.डॉ.नंदकुमार धर्माधिकारी, प्रियांका धर्माधिकारी दोघेही पुणे, आण्णा दीक्षित, रविकांत पोतदार सोलापूर, संतोष पोतदार माळशिरस. सुवर्ण युवा रत्न सारंग महामुनी पंढरपूर, उद्योग रत्न - रत्नकुमार म्हेत्रे अहिल्यानगर, प्रितीश वेदपाठक सोलापूर, आदित्य आष्टीकर आष्टी मोहोळ. विज्ञान रत्न - इंजिनियर जितेंद्र दीक्षित, अथर्व दीक्षित, अथर्व महामुनी,, विनायक पंडित, कुमारी दीपाली दोडमनी सर्व सोलापूर. विशेष सत्कार प्रा. अमर दीक्षित सर यांना पी. एच. डी. पदवी मिळाल्याबद्दल, आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल रोहित तपासे, एम. पी. एस सी. मार्फत डॉ मनोज वेदपाठक यांची डॉ व्ही. एम. मेडिकल कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून तर त्यांचे लहान बंधू सौरभ वेदपाठक यांची महाराष्ट्र शासन गृह विभागात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
सदर पुरस्कार प्रदान सोहळा संपल्यानंतर लागलीच वधू वर मेळावा सुरु करण्यात आला. या मेळाव्यात साधारणपणे चारसेच्या पुढे वधू वरांनी आपले नांव नोंदणी केली.
मेळाव्यासाठी उपस्थित सर्व वधू वर सुचकांचे निलेश धाराशिवकर यांनी सत्कार केले.
कार्यक्रमासाठी सांगली येथील उद्योजक प्रकाश पोतदार, इस्लामपूरचे हिरोहोंडा एजेन्सीचे मालक वशीकर, संत नरहरी समाधी मंदिर समिती पंढरपूचे जेष्ठ विश्वस्त संजय आष्टीकर अकलकोट जेऊर येथील से. नि. प्राचार्य राज सोनार, सोनार समाजाचे नेते राजेश पंडित रेणापूरकर अंबाजोगाई, पनवेलचे बाळकृष्ण पोतदार, मुबंई येथील भाभा सेंटरचे पंडित,बार्शीचे प्रकाश महामुनी, सांगली अरगचे उद्धवराव पोतदार, सोलापूर आकाशवाणीचे वृत्त निवेदक महेश अनाळकर, इंजि. दीपक पोतदार, दीपक कुरुलकर, शाम पोतदार, बाळकृष्ण अंजनगावकर,सुनील पंडित,श्रीनाथ पोतदार, मनीषा पोतदार वशीकर मिरज,आय सी डी सी गायत्री(संगीता)वेदपाठक, इंजि.किरण जमखंडीकर, सेवासदन प्रशालेच्या श्रीमती राजश्री पोतदार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे मोहन मंद्रूपकर, संजय मैदर्गीकर, संतोष कळमणकर, अध्यक्ष वसंत पोतदार, उपाध्यक्ष विजयकुमार पोतदार, सचिव दत्तगुरु वेदपाठक, सहसचिव गिरीश जमखंडीकर खजिनदार गजानन सोनार,इंजि. विजयकुमार पोतदार, इंजि. रुद्रप्पा दोडमनी प्रा. डॉ. अमर दीक्षित महिला प्रतिनिधी मृणालिनी मैदर्गीकर, संध्या कळमणकर, पल्लवी महामुनी, पांचाळ सोनार संस्थेचे अध्यक्ष निलेश धाराशिवकर, उपाध्यक्ष अमोल महामुनी, सचिव सतीश पोतदार, अविनाश पंडित, कालिका पतसंस्थेचे चेअरमन अमोल दीक्षित, ऑडिटर प्रकाश कांबळे, अनील टंकसाली, प्रकाश तपासे, मॅनेजर लक्ष्मीकांत जिंदम, महिला कर्मचारी अनिता सारंगमठ, श्रीमती राजश्री टाक, विनायक स्वामी आदिनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन प्रवीण देशमुख सर यांनी केले.
Tags
सामाजिक वार्ता