वैद्यकीय क्षेत्रासाठी एंडोस्कोपी एक वरदान -- डॉक्टर उदयसिंह पाटील

संजीवनी हॉस्पिटल सांगोला दुसरा वर्धापन दिन साजरा
सांगोला प्रतिनिधी-- 
मानवी जीवनात सध्या पोटाचे विकार झपाट्याने वाढत आहेत व यामध्ये पोटात दुखणे, अपचन, मळमळ, पोटाची कॅन्सर वाढण्याचे प्रमाण अधिक आहे व याच्या तपासासाठी एंडोस्कोपी एक वरदान ठरत आहे व अत्यंत आधुनिक लेटेस्ट मशीन संजीवनी हॉस्पिटल सांगोला येथे डॉक्टर सुधीर व डॉक्टर सुहास ढोबळे यांनी आणल्यामुळे आता मिरज सांगली सोलापूर येथे जाण्याची गरज नाही व सांगोला तेच पोटाचे निदान होणार आहे. व सांगोलकर खरोखरच तुम्ही नशीबवान आहात अशी संजीवनी हॉस्पिटल सांगोला यांच्या दुसऱ्या वर्धापनदिनी डॉक्टर उदयसिंह पाटील यांनी मत व्यक्त केले. 
     संजीवनी हॉस्पिटल सांगोला दुसऱ्या वर्धापनदिनी एंडोस्कोपी मशीनचे उद्घाटन मिरज येथील सुप्रसिद्ध डॉक्टर उदयसिंह पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर सुधीर ढोबळे हे एक आज्ञाधारक डॉक्टर असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे काम अग्रेसर आहे व एकादी शंका असल्यास फोनवरून विचारून त्याचे निरसन करतात व हे गुण त्याचे वडील डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांच्याकडून त्यांच्याकडे आले असावेत असे वाटते. पोटाच्या उज्वल भविष्यासाठी एंडोस्कोपी द्वारे निदान होते तरी रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी आवाहनही उदयसिंह पाटील यांनी यावेळी केले. सुरुवातीस डॉक्टर उदयसिंह पाटील यांचे स्वागत डॉक्टर शिवाजीराव ढोबळे, डॉक्टर सुधीर, डॉक्टर सुहास, डॉक्टर मोनिका, सौ रेशमा व सौ प्रतिभा ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form