ग्रामीण भागात अष्टपैलू खेळाडू घडतात -- दत्तात्रय मोहिते

विलासराव देशमुख विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न 
पंढरपूर प्रतिनिधी-- 
शहरी भागाच्या मानाने ग्रामीण भागात वातावरण पोषक असते त्यामुळे अष्टपैलू खेळाडू घडत असतात.आज सर्वात जास्त खेळाडू ग्रामीण भागातुन पुढे येत आहेत. शहरामध्ये त्यांना सोयी सुविधा मिळतात परंतु मैदानांची उपलब्धता हवी तेवढी नसते. आज किडा सप्ताहांमुळे उत्कृष्ट खेळाडू घडण्यास मदत होत आहे,असे आयोध्या ज्वेलर्सचे प्रोप्रा दत्तात्रय मोहिते यांनी सांगितले.

उपरी तालुका पंढरपूर येथील मा. विलासराव देशमुख हायस्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे  उद्घाटन दत्तात्रय मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच गहिनीनाथ कोळी,माजी सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण,माजी उपसरपंच महेश नागणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरख नागणे,मुख्याध्यापक बिबीशन कलागते, प्राचार्य मधुकर कलागते  उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या सप्ताहामध्ये खोखो, कबड्डी,स्लो सायकल,संगीत खुर्ची, तीन पायांची शर्यत,फनी गेम्स, क्रिकेट, उंच उडी,धावण्याच्या शर्यती, दोर उडी,रस्सीखेच असे विविध मैदानी व सांघिक खेळ घेण्यात आले.या प्रसंगी शिक्षक विलास राऊत, दिलीप जगताप,लक्ष्मण कुंभार, नागनाथ महाडिक, शिवाजी नागणे,प्रा. फिरोज मुलाणी,प्रवीण नागणे, चारुशीला नागणे,यांनी क्रीडा सप्ताह यशस्वी होण्याकरता परिश्रम घेतले. सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form