काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.
संग्रामनगर दि.१० (संजय लोहकरे यांजकडून)
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष युवक हृदयसम्राट डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी आज आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे.
काँग्रेस पक्षातील सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हुकूमशाहीला व मनमानीला कंटाळून अखेर डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेस पक्षात काम करत असताना जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते ज्याप्रमाणे आम्हीच काँग्रेसचे सर्वस्व नेते असल्याचा अविर्भाव दाखवत होते.त्यामुळे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता युवकांचे हृदयसम्राट डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू खंदे समर्थक माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सतीश नाना पालकर,अकलूज शहराध्यक्ष नवनाथ भाऊ साठे,युवक उपाध्यक्ष मयूर माने,कैलास जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराचा वारसा व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द सुरू आहे. सहकार महर्षी व स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी राजकारणामध्ये ताठ मानेने राजकारण केले आहे हे संपुर्ण महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलेले आहे.तोच वसा आणि वारसा जपणाऱ्या डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या धाडसी निर्णयाचे राजकीय वर्तुळामध्ये कौतुक केले जात आहे.
Tags
राजकीय वार्ता