दिवाणी न्यायाधीश सोनवलकर साहेब यांच्या उपस्थित संपन्न शिबिर संपन्न...
पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपर अधिवक्ता संघ पंढरपूर व तालुका विधी सेवा समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदे विषयक शिबिर दिनांक 10/ 12/ 2024 रोजी दुपारी 2 वाजता मातोश्री सखुबाई कन्या प्रशाला पंढरपूर येथे पार पडले. या शिबिरामध्ये "POCSO (Protection of Children from Sexual Offence Act 2012" याबद्दल सखोल असे कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे
मुख्याध्यापक धनवट सर यांनी केले.
यामध्ये अध्यक्ष राजेश चौगुले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली यामध्ये त्यांनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्याचे तसेच स्पेस टेक्नॉलॉजी शिक्षण घेऊन अंतराळवीर होण्याचे आवाहन केले, सचिव अभयसिंह देशमुख यांनी "महिलांची कायदेशीर हक्क व अधिकार" बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.
तसेच सदस्य गणेश चव्हाण यांनी International Human Right Day याबद्दल माहिती. तसेच एडवोकेट अर्चना कुलकर्णी यांनी भारतीय राज्यघटनेमधील विद्यार्थिनीचे शिक्षणाचे हक्क आणि अधिकार याबद्दल मार्गदर्शन केले तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री सोनवलकर साहेब यांनी विद्यार्थिनींना कायदा विद्यार्थिनीचे हक्क अधिकार तसेच कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तरी त्याला वाचा फोडून अन्याय दूर करण्यासाठी कोठे दाद मागायची त्याबाबत कायद्यातील तरतुदी तसेच POSCO कायद्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष महेश कसबे यांनी केले या कार्यक्रमाला वकील संघाचे सदस्य वर्षा हिरणवाले ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे तसेच माजी मुख्याध्यापक सुनील यारगट्टीकर आदी उपस्थित होते
Tags
सामाजिक वार्ता