पंढरपूर प्रतिनिधी --
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार,पंढरपूरचे सुपुत्र,महाविद्यालयीन काळातील आमच्या अनेकांचे खास मित्र राजाभाऊ खरे यांची मोहोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयश्री खेचून आणली निमित्ताने चंद्रमौळी मित्र मंडळ,गडम बिल्डिंग, पंढरपूर" या मित्रपरिवाराच्यावतीने भव्य सत्कार व सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी आमदार राजु खरे यांनी गडम बिल्डिंग कट्टा येथिल जुन्या आठवणी व मैत्रीचे किस्से सांगितले.मी प्रतिकुल परिस्थिती लहानाचा मोठा झालो पण माझा मित्र परिवाराने मला सातत्याने प्रोत्साहन दिले मला अडचणी सोडविण्यासाठी मदत केली त्यावेळी मी चांगला उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता,ते यशस्वी आमदार होऊ शकलो. माझा मित्र परिवाराने केलेला सत्कार व सन्मान हा अस्मरणीय आठवण असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रस्ताविक करताना मंदार केसकर यांनी त्यांची विशेष ओळख करून देताना सांगितले की,साधारण 1992 ते 2000 सालात गडम बिल्डिंगच्या कट्ट्यावर मित्रांच्या घोळक्यात "मी एक दिवस आमदार होणार " असं म्हणणारे पंढरपूरचे सुपुत्र आमदार राजाभाऊ खरे यांनी आपलं म्हणणं सुमारे पंचवीसेक वर्षांनी "खरं" करून दाखवलं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना धाडसी स्वभाव, नम्र पण प्रसंगी स्पष्टवक्तेपणा,सर्व स्तरातील प्रचंड मित्रपरिवार यांच्या बेरजेवर प्रस्थापितांना धक्का देऊन मोहोळ विधानसभेत यश मिळवलं. सुरुवातीच्या काळात हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा भाग असलेल्या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांनी संघटनेला सुरुवात केली. पुढं जाऊन युवा सेना, शिवसेना या माध्यमातून काम करीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीवर निवडणूक लढवून विजय मिळवला. सुरुवातीपासूनच पक्ष, समाज हा भेद न करता केवळ "मित्रपक्ष" हा पक्ष त्यांनी जोडून ठेवला या न्यायाने आमदार राजाभाऊंनी यश मिळविल्याचा सर्व मित्रांना अभिमान आहे म्हणून सदर सत्काराचे नियोजन आमचे मित्र पंकज तोंडे, बंडोपंत खटावकर, अमर गडम व इतर चंद्रमौळी परिवाराच्यावतीने केले. विधिमंडळात भविष्यकाळात आमदार राजाभाऊ यांच्याकडून मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागावेत व राज्यहित, राष्ट्रहिताच्या अनेक निर्णयात त्यांचा सहभाग असावा हीच श्री पांडुरंग-रुक्मिणी चरणी सदिच्छा.
यावेळी गडम बिल्डिंग कट्टा येथे आमदार राजु खरे यांच्या सत्कार व सन्मान सोहळ्यासाठी मित्र परिवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता