महिलांनी सुशिक्षित होणे काळाची गरज :- Adv. सिद्धेश्वर चव्हाण

IDFC First भारत कडून आंतरराष्ट्रीय हिंसाचार निर्मूलन दिवस साजरा...
पंढरपूर प्रतिनिधी --
आंतरराष्ट्रीय हिंसाचार निर्मूलन दिनाचे औचित्य साधून IDFC First Bharat मार्फत Stop Violence Against Women तसेच महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम श्रीराम मंगल कार्यालय येथे पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे म्हणून Adv.श्री सिद्धेश्वर चव्हाण, अध्यक्षस्थानी डॉ. संगीता पाटील,निर्भया पथकच्या हेड कॉन्स्टेबल सौ. स्वाती लोंढे व सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद पवार उपस्थित होते. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना Adv.चव्हाण यांनी 21 व्या शतकातकाकडे वाटचाल करत असताना महिलांनी सुशिक्षित होऊन समजात आपले स्थान आणखी बळकट करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले त्याच बरोबर महिलांसाठी अस्तित्वात असणाऱ्या कायद्याविषयी माहिती दिली. 
तसेच, कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. संगीता पाटील यांनी महिलांना त्यांचे आरोग्य व त्यांचा आहार कोणत्या प्रकारे असावा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सरकारी हॉस्पिटल मधे असणाऱ्या महिलांच्या सेवा व सुविधा याबद्दल देखील मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे समन्वयक तथा IDFC CSR विभागाचे Regional Head श्री. शरद डेडे  यांनी CSR विभागामधील होणाऱ्या कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा सांगितला.तसेच, IDFC चे Divisional Manager श्री. आनंद कुरे यांनी बँकेमध्ये असलेल्या सेवा व सुविधा यांची माहिती उपस्थित महिलांना दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित कवडे व विकी झेंडे यांनी केले तर साहिल मुलांनी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाखा प्रमुख तसेच  सर्व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form