सोलापूर प्रतिनिधी--
पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना आणि पांचाळ सोनार समाज संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विध्यमाने निर्मिती लॉन्स, सैफुल चौक, विजापूर रोड सोलापूर येथे रविवारी दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते संध्या. 5 या वेळेत पांचाळ सोनार समाजातील विवाह ईच्छुक नवं वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा मेळावा विना शुल्क, कोणतीही फी न घेता आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
गत वर्षी वधू वर पी डी एफ फाईल तयार करण्यात आली होती पण बऱ्याच पालकांनी वधू वर सूची तयार केली असती तर चांगले झाले असते असे मत व्यक्त केलेमुळे त्यांची सूचना विचारात घेऊन यावर्षी वधू वर सूची तयार केली जाणार आहे. मात्र सदर सूची मोफत देणे संस्थेला परवडणारे नाही. मात्र सदर सूचीचे सर्वाना परवडेल असे सेवा मूल्य रुपये 350 /--इतकी ठेवण्यात आली आहे. तरी मेळाव्यासाठी येताना वधू वर यांनी एक तास अगोदर मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपली नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्यात विवाह इच्छुक नव वधू वर, विधवा, विधुर, अपंग व घटस्फोटीत अशा सर्व स्तरातील वधू वर यांना आपला भावी जोडीदार निवडण्यासाठी नांव नोंदणी करून सहभागी होता येईल. मेळाव्यासाठी वधू वर यांचा बायोडाटा व्हाट्सअप, ऑनलाईन, तसेच पोस्टाने स्वीकारला जाणार नाही. मेळाव्यास विवाह इच्छुक वधू वर यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. वधू वर परिचय मेळावा हा सामाजिक उपक्रम असून पांचाळ सोनार समाजासाठी पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना व पांचाळ सोनार समाज संस्था सोलापूर यांच्या माध्यमातून्न मोफत राबविण्यात येतं आहे.
तरी पांचाळ सोनार समाजातील जास्तीत जास्त विवाह इच्छुक प्रथम वधुवर, विधवा, विधुर, घटस्फोटीत, अपंग वधू वर यांनी आपला भावी जोडीदार निवडण्यासाठी पालकांसोबत उपस्थित राहावे. वधू वर यांनी मेळाव्यास येताना त्यांचे बायोडाटा व दोन आय साईझ रंगीत फोटो आणावे . एक फोटो नोंदणी फॉर्म वर चिकटवावा व एक फोटोच्या पाठीमागील बाजूस आपले नांव गांव लिहून नोंदणी फॉर्म सोबत जोडावा.मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या वधू वरांचाच बायोडाटा स्वीकारणेत येईल. मेळाव्या संदर्भात अधिक माहितीसाठी सर्वश्री मोहन मंद्रूपकर 94223 80712, संजयजी मैदर्गीकर 98226 68690, संतोष कळमणकर 98501 36061,निलेश धाराशिवकर 89836 77759, विजयकुमार पोतदार 90499 96946 यांचेसी संपर्क साधावा. असे अध्यक्ष वसंत पोतदार यांनी कळविले आहे.
Tags
सामाजिक वार्ता