प्रतिनिधी पंढरपूर _
श्री सिताराम महाराज समाधी मंदिर ट्रस्ट खर्डी व समस्त ग्रामस्थ खर्डी यांच्या वतीने श्री सद्गुरू सिताराम महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक २२ रोजी पासून करण्यात आले आहे. यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
मिठी कार्तिक वद्य ७ शके १९४६ शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता श्री सिताराम महाराज पुण्यतिथी महोत्सवा
निमित्त नामसप्ताह प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यामध्ये पहाटे पूजा, काकड आरती, दुपारी १२ वा. अभिषेक, महानैवद्य व महाप्रसाद, दुपारी ५ ते ६ वाजेपर्यंत प्रवचन सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ त्यानंतर पूजा व आरती होणार आहे. यासह किर्तन, तसेच रात्री संगीत भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री सिताराम महाराज पुण्यतिथी उत्सव भंडारा मीती कार्तिक कृष्ण १३ शके १९४६ गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता महापूजा, पुष्पवृष्टी, आरती, महाप्रसाद व रात्री संगीत भजन होणार आहे.
श्री सिताराम महाराज पुण्यतिथी महोत्सव नाम सप्ताहाचां सांगता समारंभ कार्यक्रमानिमित्त शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता भजन, महापूजा, आरती व महाप्रसाद यासह रात्री ८ वाजता श्रींची पालखी नगर प्रदक्षिणा आधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सदर कार्यक्रमासाठी सांगोला व पंढरपूर येथून एसटीची सोय करण्यात आली आहे. तरी भाविक भक्तांनी श्री सिताराम महाराज पुण्यतिथी महोत्सव नाम सप्ताह कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिताराम महाराज समाधी मंदिर ट्रस्ट खर्डी अध्यक्ष दीपक रोंगे व समस्त ग्रामस्थ मंडळी खर्डी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Tags
धार्मिक वार्ता