आम आदमी पार्टी उमेदवार अनिल सावंत यांच्या सोबत....


पंढरपूर प्रतिनिधी--
मंगळवेढा तालुक्यातील आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष एकनाथ फटे,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बाबर मंगळवेढा शहराध्यक्ष भारत शिंदे यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे राष्ट्रवादी शदर पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी सोबतकरत मैदानात उतरले आहेत. 

आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर भाजपने ईडी सीबीआयचा गैरवापर करून तुरुंगात टाकले. तसेच भाजपवाले सत्तेवर आले तर राजकीय फायदा घेऊन इतर राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे काय करायचं ठरवतील.त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत येणे फार आवश्यक असल्याचं सांगत आपण ही लढाई निश्चित जिंकू, असा विश्वास तालुकाध्यक्ष एकनाथ फटे व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form