पंढरपूर प्रतिनिधी--
मंगळवेढा तालुक्यात गावभेट आयोजित गावभेट दौऱ्यात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी बोलताना मंगळवेढा तालुक्यात अनेक वर्षापासून पाणी प्रश्नावर निवडणूक लढली गेली, आणि सर्व सामान्य जनतेची दिशाभूल केली असे म्हणत विरोधकांचा समाचार घेतला.
मंगळवेढा गावभेट दौऱ्यात उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना अनिल सावंत म्हणाले,आतापर्यंत पंढरपूर मंगळवेढ्याची विधानसभा निवडणुक केवळ पाणी प्रश्नावर लढली गेली आहे. या मतदारसंघातला पाणी प्रश्न कधी संपणार आहे का नाही? जर मला मतदारांनी संधी दिली, तर मी निश्चितपणे सांगतो,पाणी प्रश्न कायमचा सोडवेल. मंगळवेढा शहरातील अंतर्गत रस्त्याची समस्या यासारख्या पायाभूत सुविधांच्या समस्या तर सोडवेनच पण या भागात मोठा उद्योग उभारण्यासाठी माझा प्रयत्न असेल.
इथल्या उच्चशिक्षित आणि होतकरू तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावं लागतं. इथल्या तरुणांना इथेच नोकरी कशी मिळेल, यासाठी माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत, त्या मी निश्चितपणे या ठिकाणी राबवेल. तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इतरत्र बाहेरगावी जावं लागतं. त्यामुळे उच्च शिक्षणाची सोय देखील याच ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे.
सदर आयोजित गावभेट दौऱ्यात
मंगळवेढा तालुक्यातील मुढवी, उचेठान, बठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर, बोराळे, कर्जाळ, कात्राळ, डिकसळ, या गावात महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्याकडून प्रचार सभा,गावभेट दौरा, करण्यात आला.
Tags
राजकीय वार्ता