पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशीसह काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा दिलेला आहे.
यावेळी बोलताना अमर सूर्यवंशी यांनी आम्हाला काँग्रेसचा उमेदवार मान्य नाही,त्यामुळे आम्ही काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनिल सावंत यांच्या पाठीशी आहोत.आम्ही खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात नाही,कुणाचा दबाव नाही,आम्हाला अनिल सावंत यांचे नेतृत्व आवडले म्हणून आम्ही अनिल सावंत यांना पाठिंबा देतोय असे ते म्हणाले.यावेळी
काँगेस पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, पंढरपूर युवक शहराध्यक्ष संदीप शिंदे, सेवादल शहराध्यक्ष गणेश माने, व्हीजेएनटी शहराध्यक्ष गोकुळ माने, सोशल मीडिया अध्यक्ष महेश अधरराव, काँग्रेसचे जिल्हा सचिव पांडुरंग डांगे, काँग्रेसचे विधानसभा युवक अध्यक्ष सोमनाथ आरे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सागर कदम, शैलेश घोगरदरे, अंशुभन शिंदे, काँग्रेस सरचिटणीस पिंटू जाधव, शहर सचिव अनिल माने, शहर सचिव सुदीप पवार, शहर उपाध्यक्ष आण्णा अधरराव, किशोर महाराज जाधव आदी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज मला पाठिंबा दिला.
यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे उमेदवार अनिल सावंत म्हणाले की,
हा राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदारसंघ आहे. काल जयंत पाटील यांनी देखील अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, सुधीर भोसले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे,आम आदमी पक्षाचे,एम पाटील व जिल्हाध्यक्ष, औदुंबर शिंदे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
राजकीय वार्ता