विकासाचा रथ प्रभावीपणे राबवण्यासाठी महायुतीचा विजय महत्वाचा -- माजी आमदार प्रशांत परिचारक

कार्यकर्ता संवाद मेळाव्याला महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे प्रचार सभेत मार्गदर्शन करतेवेळी....
मंगळवेढा प्रतिनिधीः--
महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समविचारी आघाडी यांच्या पुढाकाराने श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्याला महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे व मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महायुतीच्या विजयाच्या दृष्टीने भक्कम मोर्चेबांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आलं.मतदारसंघात विकासाभिमुख धोरण आणखी प्रभावीपणे
राबवण्यासाठी महायुतीचा विजय महत्वाचा आहे,असं स्पष्ट प्रतिपदान मा. आमदार प्रशांत परिचारक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतातून केलं.
तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी समविचारी आघाडी महायुतीच्या बाजूने भक्कपणे उभी असेल, असे समविचारी आघाडीचे नेते अजित जगताप यांनी उपस्थितांनां संबोधताना मत व्यक्त केले. सदर मेळाव्या प्रसंगी जेष्ठ नेते रामचंद्र भाऊ जगताप, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्य सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष प्रकाश आप्पा गायकवाड, माजी संचालक लक्ष्मण तात्या जगताप, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे, माजी नगराध्यक्ष विजयकुमार खवतोडे, माजी उपगराध्यक्ष पै. ज्ञानेश्वर भगरे, चंद्रकांत काका पडवळे, आप्पासाहेब चोपडे, माजी नगरसेवक अजित आप्पा जगताप, प्रवीण खवतोडे, महादेव भाऊ जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा संघटक युवराज घुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष मुझ्झमिल काझी, संभाजी घुले, सोमनाथ बुरजे, बाळदादा नागणे, सौ. माधुरी हजारे, सौ. छायाताई मेटकरी, सौ. सुनीताताई मेटकरी, रेखाताई साळुंखे, माकानदार भाभी, राहुल आप्पा सावंजी, चंद्रकांत पडवळे, सरोजभाई काझी, सोमनाथ बुरजे, नजीरभाई इनामदार, शिवानंद पाटील, बबलू सुतार, विक्रम भगरे, किशोर दत्त, अशोक माळी, बशीरभाई बागवान आदी मान्यवरांसह समविचारी आघाडीचे कार्यकर्ते, महायुतीचे सर्व पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व मंगळवेढा ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form