सर्व सामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारा लोकप्रतिनिधी निवडा -- भगिरथ भालके

पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना दुध दर, हमीभाव,पिकविमा, पाणी,आरक्षण,
महिला अत्याचार यासह अनेक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.मात्र ते प्रश्न सोडवण्यादृष्टीने प्रयत्न होत नाहीत.त्यासाठी आपल्या अडचणी समजून घेणारा आणि आपल्या सुख दुःखात सहभागी होणारा लोकप्रतिनिधी निवडा असे आवाहन महाविकास आघाडीचे काॅग्रेंस प‌क्षाचे अधिकृत उमेदवार भगिरथ भालके यांनी केले.

निवडणूक प्रचारानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी, खोमनाळ, हिवरगाव, भाळवणी, जालीहाळ, सिध्दनकेरी, हाजापूर, डोंगरगाव या गावाच्या दौऱ्याप्रसंगी भाळवणी येथे आयोजित प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना भालके म्हणाले की,पोटनिवडणुकीत माझ्या पराभवानंतर या भागातील जनतेला तीन वर्षात अनेक अडचणीला सामोरे जावे लागले मात्र त्या सोडवण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधीकडून प्रयत्न होत नाहीत असा घनाघात त्यांनी केला तर उलट ३००० कोटीची विकास कामे झाल्याचे सांगत प्रमुख प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष केले.आम्ही दामाजी कारखान्याला समविचारी आघाडीच्या माध्यमातून सत्ता बदल केला तर मंगळवेढा पाणी प्रश्न असो वा विविध योजना असो स्व.भारत भालके यांच्या प्रयत्नाने झाले आहेत.

महायुतीच्या काळात दुधाचे दर घटल्याने शेतकऱ्यांना दूध दरासाठी संघर्ष करावा लागत आहे.मराठा,धनगर,मुस्लिम
आरक्षणासाठी तर महिलांवर होणाऱ्या अत्याचारा,अशा विविध सामाजिक विषयांवर लोकप्रतिनिधीनीं हक्कासाठी न्यायासाठी प्रयत्न होणे आवश्यक असताना त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे असे ते म्हणाले सामान्य जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी जन आशीर्वाद यात्रा केली ते यात्रेमध्ये नागरिकांनी अनेक अडचणी सांगितल्या. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form