महाविकास आघाडीच्यावतीने भगिरथ भालके यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज..

 
शरद पवार (गट) राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार...
पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुक अतिशय चुरशीची लढत पाहव्यास मिळणार असल्याचे चित्र असतानाच आज गुरु पुष्यामृत शुभ मुहूर्तावर युवा नेते भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीच्यावतीने  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना भालके म्हणाले की महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने व आदेशानुसारच मी अर्ज दाखल केला आहे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक, सर्वसामान्य नागरिक, पंढरपूर शहर मंगळवेढा शहर येथील लहान  व्यापारी तसेच सर्व नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व त्यांच्या सोबत कायमस्वरूपी असण्यासाठी मी ही निवडणूक लढत आहे. पंढरपूर मंगळवेढा जनतेच्या आशीर्वादाने मी खात्रीशीर निवडून येणार असे ते ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केली.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मी समविचारी आघाडीच्या  नेत्यांचे आभार मानतो की गेल्या 19 तारखेपासून मी या निवडणूक तिकीट संदर्भात वरिष्ठांची चर्चा करीत असताना पंढरपूर व मंगळवेढा येथील समविचारी आघाडीच्या सर्व नेत्यांनी महाविकास आघाडीचे नेते नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस केलेली आहे त्यामुळे मला पंढरपूर मंगळवेढा येथील समविचारी आघाडीच्या सर्व नेत्यांचा कार्यकर्त्यांचा सामान्य मतदारांचा मला आशीर्वाद लाभणार आहे म्हणून मी या सगळ्यांचे आज आभार मानतो.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेचा मी ऋणी आहे 2009 2014 2019 या निवडणुकीत माझे वडील कै.भारत नाना भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विजयी केले.त्यांच्या निधनानंतर पोट निवडणुकीत मी उभा राहिलो असता माझा पराभव झाला. त्यावेळेस माझ्याकडून ज्या चुका झालेले आहेत त्या मी दुरुस्त करून पुन्हा कामास सुरुवात केली आहे.माझ्या मायबाप जनतेने मला मतदान रुपी आशिर्वाद देऊन विजयी करावे अशी त्यांनी आवाहन केले आहे.येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आदेशानुसारच मी काम करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form