विद्यमान आमदार यशवंत माने यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज....

मोहोळ प्रतिनिधी --
आज मोहोळ येथे २४७ मोहोळ(विद्यमान आमदार यशवंत मानेअनुसूचित जाती) विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील घटक पक्ष (अजित पवार गट) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विद्यमान आमदार यशवंत माने यांनी अर्ज दाखल केला.

महायुतीतील घटक पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही विलंब न करता ३८ जागेवर उमेदवार उभे केले आहे. यामध्ये विद्यमान आमदार यशवंत माने यांचा समावेश केला आहे.यामुळे आज महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने यांनी आज पक्षाच्या वतीने अधिकृत फॉर्म सादर केला आहे .

यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्यांचे माजी व्हाईस चेअरमन कल्याणराव पाटील,माजी सभापती हनुमंत माने गुरुजी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सज्जनराव पाटील,
सोलापूर मार्केट कमिटीचे संचालक प्रकाश चौरेकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते  सुनिल भोसले, कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form