मंगळवेढा प्रतिनिधी --
रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर येथे नवरात्र निमित्त सुरू असलेल्या संगीत महोत्सवात पंढरपूर येथील कलापिनी संगीत विद्यालयाच्या ५१ विद्यार्थ्यांनी एकाच रंगमंचावर आपल्या संगीत कलेचे रोमांचकारी व अंगावर शहारे आणनारे सादरीकरण केले.
पंढरपूरच्या कलापिनी संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे संगीत कलेचे रोमांचकारी सादरीकरण मंगळवेढा येथील अशोक कोळी व मनिषा महालकरी यांच्या संकल्पनेतील सुप्रसिद्ध तबला वादक व संगीत शिक्षक विकास पाटील व प्रियंका पाटील यांच्या संकल्पनेत साकार असलेली “तबला अभंग” हि संकल्पना मंगळवेढा वाशियांना खूप भावला.
वारकरी सांप्रदयाच्या नियमानुसार पंचपदी व तदनंतर अभंग गातांना ओंकार स्वरुपा,
कानडा राजा पंढरीचा,अभिर गुलाल या अभंगांवर सर्व विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.यावेळी३५ तबला वादक व १६ गायक अशा सर्वांनी एकत्रित हा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात श्रोता वर्गही उपस्थित होता.
Tags
संगीत कला वार्ता