बेगमपूरचे विकासासाठी 58 लाख रुपये मंजूर -- उद्योजक राजू खरे यांचे ग्रामस्थांकडून मानले विशेष आभार

पंढरपूर प्रतिनिधी-- 
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाची फिक्स उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी बेगमपूर गावातील विविध विकास कामासाठी तब्बल 58 लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला आहे. गावाच्या विकासासाठी कोणतेही पद नसताना निधी मिळवून दिल्याने खरे यांचा विशेष सन्मान करीत आभार व्यक्त करण्यात आले.
   या मंजूर करण्यात आलेल्या विकास निधीमध्ये प्रकाश सपाटे  वस्ती ते रंगसिद्ध चिमराया मंदिर पर्यंतचा रस्ता खडीकरण करण्यासाठी 24 लाख रुपये, कुंडलिक पाटील वस्ती ते तुकाई मंदिर रस्ता खडीकरण करण्यासाठी 24 लाख रुपये, बेगमपूर येथील दलित वस्ती मधील कॉंक्रिटीकरण  कामासाठी दहा लाख रुपये असा एकूण 58 लाख रुपयांचा निधी खरे यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आला आहे.
   बेगमपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे वेळी उद्योजक राजू खरे यांनी विद्यमान आमदार यशवंत माने यांचे सह माजी आमदार राजन पाटील यांचेवर तोफ डागली. या पाच वर्षांमध्ये 3000 कोटी पर्यंतचा निधी मंजूर करण्यात आला असल्याच्या वल्गना केल्या जात आहेत. तरीही या मतदारसंघातील जनता आमच्यासारख्या कडे पाणी आणि रस्त्याच्या मागणीसाठी येत आहेत. आपणही त्या मागणीचा विचार करून मागील त्याला रस्ता आणि मागील त्याला पाणी, यासह अनेक प्रकारचे सहकार्य करण्यास आपण मागे पुढे पाहिले नाही. मग या मंडळींनी आणलेला भला मोठा निधी कुठे गेला? असा प्रश्न ही खरे यांनी विचारला आहे. पाण्याची भीषण टंचाई असल्याने मोहोळमधील संघातील जनतेने आपल्या नातेवाईकांनाही आपल्याकडे येण्यास मनाई केली होती. वरील नेते मंडळी कुठे गेली होती. भीषण पाण्याची टंचाई संपताच कोठ्यावधीचा निधी मंजूर करण्यात आले असल्याचे फलकही गावोगावी उभारण्यात आले आहेत. याचाही समाचार खरे यांनी घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form