सांगोला (उत्तम चौगुले) :-
सोलापूर जिल्ह्यातील वायुसेनेतील माजी सैनिकांचा मंगळवेढा येथे "92वा एयर फोर्स डे" साजरा करण्यात आला. एअर फोर्स डे च्या सेलिब्रेशन साठी सोलापूर जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून वायुसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपीनाथ माळी आणि स्वामी साहेब यांची एअर फोर्सच्या टीमने चांगल्या प्रकारे सेलिब्रेशनचे नियोजन केले होते.
सदर सेलिब्रेशन साठी महाराष्ट्र राज्याचे भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय गोपाळ वानखेडे साहेब अध्यक्ष म्हणून लाभले होते प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अरुण कुमार तळीखेडे आणि ग्रुप कॅप्टन उत्तम पाटील सांगोला यांनी माजी सैनिकांना संबोधित करताना जास्तीत जास्त माजी सैनिकांनी एकत्रित येऊन संघटनेला मजबूत करावे असे आवाहन केले .
सदर समारंभामध्ये मंगळवेढा येथे दामाजी एक्सप्रेसचे संपादक पत्रकार दिगंबर भगरे सर ढगे डिजिटल मीडियाचे लहू ढगे तसेच कर सल्लागार व लेखापरीक्षक दत्तात्रेय कोरे यांना "सैनिक मित्र" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात अशा अनेक मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यांच्या आनंद घेवून सर्व परिवारा बरोबर स्वादिष्ट आशा भोजनाचा आस्वाद घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्या वेळी ग्रुप कॅप्टन उत्तम पाटील यांनी यांनी एयर फोर्स डे निमित्त सर्वांना सुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी सांगोला ,सोलापुर, नागपूर ,पुणे येथून वायुसेनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता