पंढरपूर प्रतिनिधी--
कोंढारकी येथील नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवसा
निमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच
रक्तदान शिबिराचे सलग पाचवे वर्ष असून शिबिराचे उद्घाटन लघु पाटबंधारे अधिकारी सोमनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय हॉस्पिटलचे कर्मचारी रियाज आयुब हे होते.
तसेच सायंकाळी वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळा विठाई गुरुकुल तीर्थक्षेत्र ह.भ. प.सूर्याजी महाराज भोसले यांचा कीर्तन सोहळा संपन्न झाला. त्यांनी आपल्या अमृत कीर्तनवाणीतून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तसेच अन्नदानाचे महत्त्व पटवून सांगितले समाजा त समाजिक परिवर्तन व्हावे तसेच आपली पिढी सुसंस्कृत घडवावी आई वडिलांची सेवा करा,व्यसनापासून दूर राह,तरुण पिढीने भरकटत न जाता परमार्थाचा छंद जोपासावा सुसंस्कार परिवार बनवावा असा उपदेश आपल्या कीर्तनातून त्यांनी समाजाला दिला.
याप्रसंगी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुदाम दादा मोरे शुभेच्छा देतेवेळेस त्यानी नेहरू मंडळाचे अध्यक्ष हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी समाजाला आपल्या कार्यातून सामाजिक संदेश दिला आहे ते नेहमी सर्व कामात अग्रेसिव्ह असतात त्यांना असेच नेहमी सामाजिक उपक्रम घ्यावेत व समाजात आदर्शवत कार्य करावे त्यांना दीर्घायुष्य लाभो असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
तर या कार्यक्रमासाठी एम आर नितीन सावंत, विकास कांबळे, कुलकर्णी, सुहास ठगारे,उपसरपंच आबा मोरे,ग्रामपंचायत सदस्य अतुल मोरे,मधुकर मोरे, शिक्षणाधिकारी नवनाथ मोरे ,उत्तम मोरे महाराज,ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सागर नागणे,प्रेरणाबीज भंडाराची दिवाणजी सिद्धेश्वर दांडगे, प्रगतशील बागायतदार हनुमंत पाटील, बिभीषण दांडगे, सामाजिक कार्यकर्ते राम पाटील, राजाभाऊ फुगारे मित्रपरिवार व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता