मौलाना आझाद रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) स्थापन करून निधी द्याराष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

पंढरपूर प्रतिनिधी--
महाराष्ट्रातील मराठी मुस्लिम समाज हा मागासलेला आहे हे महेमदुर रहमान समितीच्या अहवालातून सिध्द झाले आहे. मुस्लिम समाजाचा मागासलेला पणा दूर करण्यासाठी मुस्लिम तरूण, तरूणींच्या शैक्षणिक विकासासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाने मौलाना आझाद रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला होता परंतू दुदैवाने वित्त विभागाने सदरचा प्रस्ताव नाकारलेला आहे. 

त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी मुस्लिमांवर यामुळे अन्याय झालेला आहे. सर्व समाजाचा विकास व्हावा हे पुरोगामी महाराष्ट्राचे धोरण आहे. सध्या इतर समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी, सारथी, महाज्योती यासह विविध संस्था कार्यरत असताना महाराष्ट्रातील मराठी मुस्लिम समाजावर अन्याय कशासाठी ? असा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे मुस्लिम समाजात नाराजी पसरलेली आहे. तरी या निर्णयाचा फेरविचार होवून मौलाना आझाद रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) स्थापन करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब व जिल्हाध्यक्ष जाकीर हुसेन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, अल्पसंख्यांक कल्याण मंत्री व अल्पसंख्यांक आयोग यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. 

या निवेदनाची प्रत पंढरपूरचे तहसिलदार यांना देण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत नायब तहसिलदार यांनी स्विकारले.
या निवेदनावर जिल्हा सचिव नौशाद शिकलकर, तालुकाध्यक्ष वसीम तांबोळी, तालुका उपाध्यक्ष जावेद आतार, शहराध्यक्ष शाहरूख मुलाणी यांच्या सह्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थीचे विजय कदम, मुबीन बागवान, माविया नाडिवाले यांच्यासह आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form