लातूर जिल्हा सोनार समाजसेवा संघाचा उपक्रम गुणवंत विद्यार्थ्यासह अनेकांचा सन्मान. पत्रकार विवेक पोद्दार यांचा विशेष सन्मान-बालाजी सुवर्णकार

लातूर प्रतिनिधी---
लातूर, : शहरातील कालिकादेवी मंदिरात लातूर जिल्हा सोनार समाजसेवा संघाच्यावतीने आयोजित समारंभात  सोनार समाजातील गुणवंतांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनार समाजसेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा डाॅ. दिपक वेदपाठक होते तर यावेळी IFS कु. प्रतीक्षा  काळे , सोलापूर महापालिकेचे सहायक आयुक्त गिरीश पंडित, कालिका देवी मंदिर समितीचे अध्यक्ष  दीपक दीक्षित ,पत्रकार विवेक पोतदार, प्रवचनकार प्रा. श्रीहरी वेदपाठक, अरविंद खर्डेकर, डॉ. अरुण दैठणकर, सुरेश पंडित, श्रीनिवासराव पोद्दार , सुरेश खर्डेकर. एच.एस.सी. बोर्डातील वरिष्ठ लिपिक श्री दाळींबे आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमात एकूण 57 दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना कु. प्रतीक्षा काळे म्हणाल्या,

विद्यार्थ्यांनी आपली नीतीमत्ता ,संस्कृती जतन करत आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्राची निवड करून आपले उच्च ध्येय गाठावे व समाज व देशासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करावा. तर श्री गिरीश पंडित यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींना धैर्याने सामना करत यश संपादन करावे असे सांगितले. तसेच सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा सोनार समाज सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. वेदपाठक यांनी केले. या कार्यक्रमात सोनार समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या  दैनिक 'सकाळ'चे पत्रकार  विवेक पोतदार  यांना  उत्कृष्ट  पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल  सत्कार करण्यात आला. तसेच संकेत संजय बारस्कर या तरुण कलाकाराचाही सत्कार करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सध्या आपली चमक दाखवत असलेल्या कुमारी मृणाल वेदपाठक या बाल                 क्रिडापट्टूचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा कार्यकारिणीचे अमोल दैठणकर, संजय बारस्कर ,अरुण नरहरी बारस्कर ,अरुण मधुकर बारस्कर, प्रकाश पोद्दार, सुशील धर्माधिकारी , श्रीमती सुरेखा महामुनी, तसेच फ्युचर क्रियेटर युवा गटाचे सर्व सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्य, कालिका बचत गटाचे सदस्य आदींनी सहकार्य केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विवेक पंडित, श्रीमती साधना दीक्षित ,कु. वैष्णवी पंडित कु.माधवी महामुनी यांनी केले तर आभार प्रदर्शन  रविंद्र बारस्कर यांनी  केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. सोनार समाजसेवा लातूरच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form