सोलापूर (प्रतिनिधी)--
येथे (सर्व शाखीय ) सोनार हक्क परिषद (महाराष्ट्र राज्य) सोलापूर जिल्हा आयोजित राज्यस्तरिय पदाधिकारी बैठक व सोनार समाज संपर्क अभियान तसेच सोनार समाजाची पुढील दिशा ठरविण्यांबाबत दि.२७/०७/२०२४ वार-शनिवार या दिवशी सकाळी ठिक:११ वा."दैवज्ञ समाज मंगल कार्यालय" तुळजापूर वेस, सोलापूर येथे प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव यांच्या उपस्थितीत सदर बैठक होणार आहे.
नवीन पदाधिकारी यांना निवडीचे नियुक्तीपत्र हे सन्माननीय प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते दिले जाणार असूनं सोनार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व बैठकीतून पुढील दिशा ठरविणे त्याच बरोबर सर्व शाखीय सोनार समाजाच्या सामाजिक ऐक्यासाठी संघटनांत्मक बांधणी व सोनार समाज संपर्क अभियान कार्यक्रम सर्वत्र राबविणे व समाजामध्ये जागरुकता व जागृती करणे याचा देखिल या बैठकीत शुभारंभ केला जाणार आहे.
तरी सर्व सोनार हक्क परिषदेशी संबंधित पदाधिकारी व सामाजिक जाणीवेतून कार्य करणाऱ्यां समाज बांधवांनी तसेच माता भगिनीं यांनी देखिल बैठकीस आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व संघटन मजबूत करण्यांच्या दृष्टीने संघटनेशी जोडले जाणे हे समाजहिताच्या दृष्टीने गरजेचे आहे. हे देखिल काळाची गरज ओळखूनं शाखा भेद न करता आपनं सर्वांनी आम्ही सर्व होय सोनार आहोत म्हणून हक्कांने या सामाजिक विषयांवरती तरी समाज म्हणून एकत्रित येवूनं आपल्यां हक्कासाठी. सोनार हक्क परिषदेच्या माध्यमांतून पुढे जात असलेल्यां चळवळीला साथ द्या व बरोबर ही या हीच कळकळीची विनंती सोनार हक्क परिषद (महाराष्ट्र राज्य) सोलापूर जिल्हाच्या वतीने करण्यांत येत आहे. हेच आग्रहाचे निमंत्रण आहे."एकसंघ शक्तीचं" सोनार समाजाच्या उन्नती व उत्कृर्षाकडे वाटचाल निश्चितचं करु शकेल याच भावनेने आता तरी एक व्हां...ही समाज भावनां समजून आपनं आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सोनार हक्क परिषद (महाराष्ट्र राज्य)व सोलापूर जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.
Tags
सामाजिक वार्ता