*सोनार हक्क परिषदेचे राज्य युवा संघटक पदी संतोष सोनार यांची निवड*

मोहोळ (तालुका प्रतिनिधी):-
सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचे राज्य युवा संघटक म्हणून येथील संतोष पंडित सोनार (शेळगावकर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
अंबाजोगाई येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमत संस्थापक अध्यक्ष राजेश भाऊ पंडित, राज्य समन्वयक राजेंद्र पारखे यांच्या उपस्थितीत उद्योजक प्रमोद  वेदपाठक( माढा), ऑल इंडिया सोनार फेडरेशन उपाध्यक्ष  सुभाष वेदपाठक यांच्या  हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले. 
संतोष सोनारांनी आत्तापर्यंत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात  सामुदायिक विवाह, गुणवंताचा सत्कार, त्याचबरोबर युवकांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी परिषदेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष श्रीमती विजया दहिवाळ, राज्य प्रवक्ते शिवशाहीर तुकाराम सुवर्णकार,सोनार हक्क परिषदेचे राज्य समन्वयक निलेशभैय्या धाराशिवकर , सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत  वेदपाठक , महिला उपाध्यक्ष मुक्ताताई डहाळे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form