जो शिकला तो टिकला या मराठी चित्रपटचे गाण्यांचे मुंबईत रेकॉर्डिंग...

पंढरपूर प्रतिनिधी--
राजसुंदरी फिल्म निर्मित मराठी चित्रपट *"जो शिकला तो टिकला"*
च्या गाण्याचं रेकॉर्डिंग मुंबईतील स्टुडिओ मध्ये आज झाले असून या गीताचे लेखन राजेश कांबळे यांनी केले आहे तर संगीत अमर देसाई यांचं आहे.   
गाण्याचं रेकॉर्डिंग मुंबईतील विलेपार्ले
येथील Buzz in studio मध्ये "तुझ्या केसाचा काढलाय कोंबडा"हे याटेम साँग प्ले बॅक सिंगर वैशाली सामंत यांच्या आवाजात रेकॉर्ड झाले असून निश्चित हे गीत रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतनार असून सदर चित्रपटाचे चित्रीकरण नागपूर,भंडारा,
गोंदिया,मुंबई आणि पंढरपूर या ठिकाणी होणार असल्याचे चित्रपटाचे लेखक ,दिग्दर्शक   चरतराज तेजपाल यांनी सांगितले.
सदर चित्रपटा मद्ये महेंद्र भंडारे ,नृत्य दिग्दर्शन रॉबिन रोहित राज, गुंजन कोचे,दिनेश रिकामे ,शशांक दर्णे,जगदीश अन्य नमावंत कलाकाराचा सहभाग या चित्रपटात असणार आहे तसेच पंढरपुरातील हरहुन्नरी कलाकार शिवराज सरनाईक आणि रविंद्र शेवडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रिकरण धनिक यादव आणि सिद्धार्थ बनसोडे करणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form