उद्या पंढरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी

जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे यांची राहणार उपस्थिती 
पंढरपूर प्रतिनिधी --
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील, युवा नेते यशराजे साळुंखे पाटील आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती दिगंबर सूडके यांनी दिली आहे.
    
सोमवारी होणाऱ्या या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, औषध वितरण, चष्मे वाटप करण्यात येणार आहे.

    यावेळी  उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ महेश सुडके,तालुका वैद्यकिय अधिकारी  डॉ एकनाथ बोधले यांचीही उपस्थिती राहणार आहे.
 हा कार्यक्रम सोमवार दि २९ रोजी वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५  वाजेपर्यंत,
  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती भक्त निवास गाळा क्रमांक ४६,४७ उंच विठोबा समोर भक्ती मार्ग पंढरपूर येथे होणार आहे.

या शिबिरासाठी पंढरपूरातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन,
आयोजक पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  दिगंबर सुडके यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form