पंढरपूर प्रतिनिधी--
सामाजिक क्रांती अभियाना अंतर्गत भीमा कोरेगाव ते पंढरपूर निघालेली धम्मपद यात्रा पूजनीय भिक्खू ज्ञानज्योती महास्थिर भिक्खू संघ यांच्या नेतृत्वाखाली धम्मयात्रा-पदयात्रेचे पंढरपूर येथे स्वागत करण्यात आले.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पूजनीय भिक्खू ज्ञानज्योती व रिपाइं चे प्रदेश अध्यक्ष मा.राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पूजनीय भिक्खू ज्ञानज्योती यांचे धम्म प्रवचन झाले .त्या नंतर सर्वाना भोजनदान करण्यात आले.नंतर धम्मयात्रा-पदयात्रेचा समारोप करण्यात आला.यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सामाजिक क्रांती अभियान
चलो बुद्ध की और...
Tags
सामाजिक वार्ता